पुणे । विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटना त्यानंतर ड्रग्जच्या जाळ्यातही पुण्याची तरूणाई अडकल्याचं दिसत आहे. दरम्यान पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत असताना अशताच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
यामध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल मधील असल्याचा दावा करण्यात येत आहे.
https://twitter.com/harish_malusare/status/1805215504321188181
पुण्यातील ड्रग्जचं जाळं वाढत मोठ्या प्रमाणात पसरल्याचं हे या व्हिडीओवरून दिसत आहे पोलीस या व्हिडीओचा तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यातील नामांकित हॉटेलमधील अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. आज कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी कोर्टाला ८ जणांसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली.















Discussion about this post