मुंबई । उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेला लागलेली गळती काही केल्या थांबताना दिसत नाहीय. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, विदर्भात आणि मराठवाड्यात ठाकरेंचे शिलेदार साथ सोडत आहेत. यातच आता ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात अर्थात छत्रपती संभाजीनगरात जबरी धक्का बसला आहे. वैजापूरमधील डॉ. दिनेश परदेशी यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ते काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरू आहे. कोकणानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे, पण तिथेही गळती लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम करीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. ठाकरेंकडून त्यांना वैजापूर विधानसभेचे तिकिट देण्यात आले होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा ते आज स्वगृही परतणार आहेत.
काही दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच सिल्लोडमध्ये भाजप सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये जाऊन निवडणूक विधानसभेची निवडणूक लढवणारे सुरेश बनकरही भाजपमध्ये स्वगृही परतले होते. डॉ. दिनेश परदेशी हे वैजापूरमध्ये अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत. सोबतच भाजपचा भाजपचा चेहरा म्हणून तिथे त्यांची ओळख होती. मात्र विधानसभा निवडणुकीत ती जागा शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशामुळे आता वैजापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे नेताच उरला नाही अशी चर्चा सुरू आहे.
Discussion about this post