छत्रपती संभाजीनगर । राज्यात आणखी एका परीक्षेतील घोटाळा समोर आला आहे. वनविभागात विविध संवर्गासाठी २ हजार ४१७ पदांसाठी भरती सुरू आहे. त्यात २ हजार १३८ वनरक्षकाची पदे आहेत. ३१ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान टीसीएस द्वारे परीक्षा घेण्यात येत आहे. त्यातला ३१ जुलैला परीक्षेचा पहिला दिवस असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये वनरक्षक भरतीचा पेपर फुटला. पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
वनरक्षक परीक्षेचा नागपूरमध्ये फुटलेल्या पेपरवरून छत्रपती संभाजीनगरातून उत्तरे सांगितले जात होती. त्यावेळी कारवाई करण्यात आली आहे. आता या नव्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराबाहेरील बजरंगनगरातील शिवराणा करिअर अकॅडमीत छापा मारून पोलिसांनी एकाला अटक केलीये तर सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सचिन गोमलाडू हा हे रॅकेट चालवितो. शिवराणा करिअर अकॅडमीचा तो संचालक आहे. दरम्यान,अकॅडमी चालकासह त्याचे अन्य साथीदार मात्र पसार झाले.
प्रत्येक उमेदवाराकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाइलद्वारे उत्तरे सांगितली जात असल्याचे तपासात समोर आले. तसेच उत्तरे सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार असल्याचेही स्पष्ट झालेय. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी विनोद प्रतापसिंग डोभाळ याला अटक केलीये तर सचिन गोमलाडू आणि लोधवाल यांच्यासह अन्य साथीदार पसार झाले आहेत.
Discussion about this post