नागपूर । राज्य सरकारने झपाट्याने वाढणाऱ्या प्रदुषणावर उपाय म्हणून जनतेला ई व्हेईकल्स खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी प्रोत्साहन म्हणून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना भरलेला आतापर्यंतचा टोल परत मिळणार आहे. त्याशिवाय राज्यातील कोणत्याही एक्सप्रेसवेवर टोल न घेण्याच्या सूचना राज्य सरकारला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केल्या आहेत.
हिवाळी अधिवेशनात इलेक्ट्रिक वाहनावरील टोलसंदर्भात चर्चा झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा नगर विकास मंत्र्यांना इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलवरून अल्टीमेटम दिला.शासनाच्या निर्णायानंतरही इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल घेणे बेकायदेशीर आहे.
राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना (ई-वाहनांना) सर्व ठिकाणी टोल माफी देण्यात आली आहे. शासन धोरण लागू करते आणि ते पाळत नाही हे योग्य नाही. येत्या ८ दिवसात राज्यातल प्रत्येक एक्सप्रेस वे अन् इन हायवेवर टोलमाफी करा. त्याशिवाय चार्जिंग स्टेशन उभारा, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.















Discussion about this post