नवी दिल्ली : भाजपच्या गोटातून मोठी बातमी असून भाजप पक्षाकडून पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहे. आता राष्ट्रीय पातळीवर भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. यात 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय महामंत्री आहेत. भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये रणनीती आखाण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष संघटनेत मोठे फेर बदल करण्यास सुरुवात केली आहे
आता राष्ट्रीय पातळीवर भाजपने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्ती केल्या जाहीर केल्या आहेत. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची नाव आहेत. आंध्र प्रदेशातून सत्या कुमार, दिल्लीतून अरविंद मेनन, पंजाबमधून नरेंद्र सिंह रैना, राजस्थानातून अल्का गुर्जर, पश्चिम बंगालमधून अनुपम हाजरा, मध्य प्रदेशातून ओमप्रकाश धुर्वे, बिहारमधून ऋतुराज सिन्हा, झारखंडमधून कामख्या प्रसाद तासा, उत्तर प्रदेशातून सुरेंद्र सिंह नागर आणि केरळमधून अनिल एंटनी यांना राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं आहे.
Discussion about this post