मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता निवडणूक आयोगाने या ११ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत. 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. 12 जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल.
सध्या विधान परिषदेवर असणारे 11 सदस्य पुढच्या महिन्यात 27 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्लाह दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील विधान परिषदेतील या 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.















Discussion about this post