मुंबईतील ५०० कोटींचं पालिकेचं हॉस्पिटल वादात सापडलं आहे. यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.गोवंडी येथे बीएमसीने सार्वजनिक निधीतून तब्बल ५०० कोटी रुपये खर्चून उभारलेले ५८० खाटांचे अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आता खासगीकरणाच्या गर्तेत ढकलले जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला असून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोट ठेवले आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘जमीन लोकांची, पैसा लोकांचा, रुग्णालयही लोकांसाठी आहे. मग ते राजकारण्यांच्या किंवा खासगी रुग्णालयांच्या घशात का घालायचं? जनतेसाठी असलेली सर्व सेवा विक्रीला काढण्याचा प्रकार सहन होणार नाही. 580 खाटांपैकी फक्त 264 खाटा गरीब आणि अंडी हे केसरी शिक्षापत्रिकाधारकांसाठी ठेवले जातील. तर बाकीच्या खाटा खासगी रुग्णांसाठी वापरले जाऊन हॉस्पिटलचा व्यावसायिक वापर सुरू होईल’.
‘स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था या निर्णयाविरोधात संघर्ष पुकारत आहोत. बीएमसी जनतेचा पैसा वापरून तयार केलेल्या सार्वजनिक सुविधा खासगीकरणाच्या दिशेने ढकण्यात येत आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला.















Discussion about this post