मुंबई । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या महायुती आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री असताना मोठा घोटाळा केल्याचा आरोप कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.आता दमानिया यांनी आज (दि.७) पुन्हा नव्याने राज्यात झालेल्या कृषी घोटाळ्याबाबतचे पुरावे त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिले आहेत.
राज्याचे माजी कृषीमंत्री आणि सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. वांद्रे न्यायालयाने त्यांच्या पहिल्या पत्नी करूणा मुंडे यांना २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज (दि.७) अंजली दमानिया यांनी ‘ह्याचे उत्तर मिळाले पाहिजे..’ असे म्हणत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुरावे दिलेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा पुरावा !
MAIDC स्वतः बैटरी पम्प ₹ २१९० /-रुपयाने खरेदी करत होते. GST सकट. ₹ २४५३ /- ला पडत होते मग धनंजय मुंडेंनी ₹ ३४२५/- ला का घेतले ?
ह्याचे उत्तर मिळालेच पाहिजे pic.twitter.com/jojUtfJcv8
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 7, 2025
अंजली दमानिया यांनी एक्स (X) पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ लिमिटेड (MAIDC) स्वतः बॅटरी पम्प ₹ २१९० /-रुपयाने खरेदी करत होते. GST सकट. ₹ २४५३ /- ला पडत होते मग धनंजय मुंडेंनी ₹ ३४२५/- ला का घेतले? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यामुळे ह्याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेदेखील अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
Discussion about this post