जळगाव । शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, अशी शक्यता वर्तवली जात असून याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या टीका केली आहे काँग्रेसमध्ये जाण्याचा पाप आमच्या हातून घडू नये, त्यामुळेच अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य वाटतो. बरे झाले अजित पवार यांनी त्यावेळी असा निर्णय घेतला, असे म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी टीका केली आहे..
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमेमध्ये शरद पवार यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. यावर मंत्री अनिल पाटील यांनी टीका केली. चुकून त्यांच्या पक्षाचे दोन तीन खासदार निवडून आले तर त्यांच्या आधारावर देशाचे राजकारण होऊ शकत नाही, अशी टीका देखील अनिल पाटील यांनी केली आहे.
संजय राऊत यांना हाताशी धरून शरद पवारांनी शिवसेना आपला मुठीमध्ये करून ठेवली आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात शिवसेनेसोबत काँग्रेस मध्ये विलीन होण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले असल्याचे देखील अनिल पाटील यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी सध्या काही बोलणार नाही. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. मात्र, वैचारिक दृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा पक्ष असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.















Discussion about this post