१२ वी पास असलेल्या उमेदवारांना अंगणवाडीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. अंगणवाडीत मदतनीस या नोकरीसाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत महिला व बाल विकासद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
भरतीसाठी वयश्रेणी:
मदतनीस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. विधवा महिलांसाठी ४० वर्ष ही वयोमर्यादा आहे. एकूण ११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. नोकरीसाठी दर महिन्याला ५,५०० रुपये वेतन दिले जाणार आहे.
पात्रता काय आहे?
नोकरीसाठी उमेदवाराची निवड त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. यामध्ये बारावी, पदवी, पदव्युतर,बी.एड, डी.एड, एमएससीआयटी केले असल्यास त्याची मार्कशीट अर्ज करताना देणे आवश्यक आहे.
२६ जुलै २२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील रहिवास उमेदवारांनीच या नोकरीसाठी अर्ज करावेत. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पाउंड जेल रोड रत्नागिरी येथे तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत.
Discussion about this post