नोकरीच्या शोधात असलेल्या १२वी पास महिलांसाठी खुशखबर आहे. महिला व बालविकास विभागामार्फत भरती निघाली आहे. अंगणवाडीत ही भरती केली जाणार असून पर्मनंट नोकरी करण्याची संधी असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने फक्त १२वीपास असणे गरजेचे आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यामध्ये १२वीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. विधवा महिला ४० वयोपर्यंत अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराने स्वतः ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. ३३ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.लातूर शहर महानगरपालिका हद्द परिसरात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२५ आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, लातूर शहर, त्रिमूर्ति भवन, पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला, बार्शी रोड, लातूर येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारी महिला लातूर महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावी. अर्जासोबतच शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
Discussion about this post