मुंबई । महाराष्ट्रात मोठी पदभरती होणार आहे. ही भरती महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत होणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या भरती प्रक्रियेच्या संदर्भात माहिती दिली आहे.
महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे.
14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती होणार आहे. या भरतीच्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यांनी ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
आदिती तटकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. तसेच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कम्युनिटी किचन करावे
राज्यातील 553 बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख 10 हजार 591 अंगणवाडी केंद्रे आहेत. 5639 अंगणवाडी सेविका आणि 13243 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे होती. ती आता भरली जात आहे. महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
Discussion about this post