पारोळा । गतिमंद असल्याचा फायदे घेत एकाने तरुणीवर तब्बल चार महिने अत्याचार केला यातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना पारोळा तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादीची बहीण ही 26 वर्षीय असून ती मतिमंद असल्याचा फायदा आरोपी जीवन बापू पाटील राहणार भोंडण तालुका पारोळा याने घेत दिनांक एक जून ते 20 जून दरम्यान तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करून तिला सतरा आठवड्यांची गर्भवती केल्याची फिर्याद पीडीतेच्या बहिणीने दिली.
याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपी जीवन बापू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदवळकर करीत आहे.
Discussion about this post