यावल । तालुक्यातील नावरे गावातील एका १८ वर्षीय तरूणीने गळफास आपली जीवन यात्रा संपविली. तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नावरे गावातील प्रणाली रामकृष्ण मेढे (वय – १८ वर्ष ) या तरुणीने शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत छताच्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून तरुणीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
तरूणीचे वडील रामकृष्ण मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी केले. तरूणीने आत्महत्या सारखे पाऊल का उचलले? हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहेत.
Discussion about this post