मुंबई । फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे १५ डिसेंबरला झाला. या दरम्यान ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, एक जागा शिल्लक आहे, ती जागा नेमकी कुणासाठी राखीव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यातच अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत.
मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे. त्या रिक्त जागेवर जयंत पाटील यांनाच संधी देण्यात येईल. असं अमोल मिटकरी म्हणाले. शरद पवार यांचे विश्वासू नेते जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरूय.
‘आता महायुतीमध्ये एक मंत्रिपदरिक्त आहे. मागे पण एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलं होतं. पण लोकसभेला मविआला चांगलीच मतं मिळाली, म्हणून त्यांनी विचार बदलला. विधानसभेत काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. माझी खात्री आहे की ते नक्की येतील. असं अमोल मिटकरी म्हणाले.
यावर ‘काही लोक नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. जयंत पाटील १०० टक्के महाविकास आघाडीमध्येच राहतील.’ असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी अमोल मिटकरींच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं.















Discussion about this post