जळगाव । खालापूरच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडीत अजूनही शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेवरून मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी एक आरोप केला आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अगोदरच माहिती दिली होती, तसेच सरकारला उपाययोजना करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मोठी दुर्घटना घटना घडली व लोकांना आपले जीव गमवावे लागले, असा आरोप अमित राज ठाकरे यांनी केला.
अमित ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी जळगावात आले होते. त्यांनी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते
अमित ठाकरे म्हणाले, की इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, त्याला काहीअंशी सरकारही जबाबदार आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत अगोदरच सूचित केले होते. त्यांनी सरकारला उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते.
Discussion about this post