जळगाव । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमातही हजेरी लावणार होते.
जळगावत युवा संमेलन कार्यक्रमासाठी भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उपस्थिती राहणार होती. अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. मात्र अमित शाह यांचा हा जळगाव जिल्ह्याचा दौरा रद्द झाला आहे.
खाजगी कारणांमुळे हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमित शाह यांचा दौरा स्थगित झाल्याच्या बातमीला जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. अमित शाह पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा सुद्धा स्थगित झालाय. त्यामुळे आता अमित शहा यांचा पुढील दौरा कधी होतो याकडे लक्ष लागलं आहे.
Discussion about this post