इराण आणि इस्त्रायलचं युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता या युद्धात अमेरिकाने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक स्थळांवर हा हल्ला केला आहे.
फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणी अमेरिकेन हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती पोस्ट करत दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सर्व अमेरिकेची विमाने ही इराणच्या हवाई सीमेबाहेर आली आहेत. ती सुरक्षित अमेरिकेत परतली आहेत. यातील सर्वाधिक बॉम्ब हे फोर्डो नावाच्या ठिकाणी टाकण्यात आले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या सैन्याचं कौतुकदेखील केलं आहे. आपण महान योद्ध्यांचं खूप अभिनंदन.जगातील कोणतेही सैन्य ही कामगिरी करु शकत नाही. आता शांतीची वेळ आली आहे.या हल्ल्यानंतर इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इराणने या हल्ल्याबाबत अजूनही मौन व्रत ठेवले आहे.














Discussion about this post