अमरावती : अमरावतीमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीने जाताना ६ जणांनी रस्त्यात गाठून पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. अब्दुल कलाम असं हत्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याला एका चार चाकीने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवलं. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. पोलीस अधिकाऱ्याला कारने उडवल्यानंतर त्यांच्या पोटावर, छतीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. एएसआय कलाम हे अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला कार्यरत होते. हल्ल्यानंतर एएसआय कलीम यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Discussion about this post