जळगाव । अमळनेरमधील पिंपळे रोडवरील विठ्ठलनगरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १२ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली. विरभान पुंडलिक पाटील (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
विरभान पाटील हे कुटुंबियांसह विठ्ठल नगर भागामध्ये राहत होते. दरम्यान त्यांनी शनिवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अंगललां गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
कुटुंबीयांना समजताच शेजारी नागरिकांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.