मुंबई । अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व बंडखोर आमदार आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट होणार आहे
यापूर्वी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तासभर ही बैठक चालली होती. आज पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला गेले असून यावेळी पवार या आमदारांशी संवाद साधणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आलं आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. शरद पवार हे सिल्व्हर ओकवर आहेत. तिथून ते वायबी चव्हाण सेंटरला निघाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे चव्हाण सेंटरला पोहोचत आहेत. जयंत पाटीलही चव्हाण सेंटरकडे यायला निघाले असल्याचं सांगितलं जात आहे.
Discussion about this post