मुंबई । राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटरवर हे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, संजय बनसोडे, आणि दिलीप वळसे-पाटील हे सर्व नेते उपस्थित आहेत.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा एक गट हा शरद पवार यांच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.















Discussion about this post