भुसावळ । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा या नद्यांना पूर आला असून, धरणाच्या जलपातळीत प्रचंड वाढ झालीय. यामुळे आज शनिवारी धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात सद्यःस्थितीत ४,२३,३९४ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील अंत्रोली गावाला जोडणारा पूल बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. अंतुरली तो पतोंडा पुलावरून पाणी असेलमुळे रस्ता बंद आहे.सध्या MP मधून पर्यायी रस्ता आहे. पुलाचे ठिकाणी तलाठी कोतवाल पोलिस आणि पोलिस पाटील देखरेख ठेवून आहेत. तसेच हतनूर बॅकवॉटर प्रभावित धोकादायक घरातील कुटुंबांना स्थलांतर करण्याची कारवाई सुरू आहे
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हतनूर धरणात पाण्याची मोठी आवक वाढली आहे. तापी नदीपात्रात सद्यःस्थितीत ४,२३,३९४ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील तापी नदी चे बक वॉटर चे पाणी खालील गावातील घरामधे शिरल्याने खालील गाव निहाय कुटुंब स्थलांतर करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post