मुंबई । बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदे याला तुरुंगातून पोलीस ठाण्यात नेले जात असताना अक्षयने एका पोलिसाचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षयचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने गोळीबार केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आता आरोपी अक्षय शिंदेला पोलीस ठाण्यात नेत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी अक्षय शिंदेच्या हाताला बेड्या घालण्यात आल्या होत्या, तसेच त्याच्या तोंडावर काळा बुरखा देखील घातलेला आहे.
अक्षय शिंदे च्या हातात बेड्या, तोंडावर काळा बुरखा, त्याला नीट चालताही येईना.
तरीही त्याने पोलिसांवर हल्ला केला आणि मग पोलिसांनी त्याचा एनकाउंटर केला.
कोण विश्वास ठेवणार? न्यायालयात तर टिकणार पण नाही. स्क्रिप्ट लिहिणारा C ग्रेड सिनेमा ही करू शकत नाही.pic.twitter.com/iuL1RGiNlG
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) September 24, 2024
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अक्षय शिंदे च्या हातात बेड्या, तोंडावर काळा बुरखा व त्याला नीट चालताही येईना. तरी देखील त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला आणि मग पोलिसांनी त्याचा एनकाउंटर केला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीवर कोण विश्वास ठेवणार? तर न्यायालयात देखील हा मुद्दा टिकणार नाही असं बोललं जात आहे.
Discussion about this post