मुंबई । संपूर्ण जगभरात मागील तीन चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले होते. मात्र आता सगळं पूर्वीसारखं सुरु असून मात्र अद्यापही कोरोनाचे भय अजूनही आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्याने स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे.
दरम्यान, अक्षय कुमारचा याचा ‘सरफिरे’ हा चित्रट सध्या खूप चर्चेत असून तो आज (12 जुलै) प्रदर्शित होत आहे. अक्षयने या चित्रपटासाठी भरपूर प्रमोशन केलंय, आता हे प्रमोशन अंतिम टप्प्यात आलंय पण दुर्दैवाने त्यामध्ये अक्षय कुमार सहभागी होऊ शकणार नाही. एवढंच नव्हे तर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा, अनंत याचा आज राधिक मर्चंटशी विवाह होत आहे, पण तेथे अक्षय उपस्थित राहू शकणार नाही. कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे अक्षय कुमार या लग्नापासून दूरच राहणार असल्याचं दिसतंय.
कसा झाला कोरोना ?
जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या सरफिरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता. यावेळीच त्याला अस्वस्थ वाटू लागले. प्रमोशनल टीमशी संबंधित काही लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला बाकीच्या टीमकडून कळले, तेव्हा अक्षय कुमारनेही कोविड चाचणी करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा त्याचा अंदाज खरा निघाला. त्यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता योग्य ती खबरदारी घेत आहे. शुक्रवारी सकाळी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्यामुळे त्याने स्वत:ला पूर्णपणे आयसोलेट केले आहे.
Discussion about this post