अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालय अंतर्गत कार्यरत तलाठीनं ‘व्हॉट्सअप’वर स्टेटस ठेवून आयुष्य संपवलं आहे. शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) असं आत्महत्या केलेल्या तलाठीचे नाव आहे.
‘व्हॉट्सअप’वर ठेवलेलं स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं, तेव्हा सारेच हादरले. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं ‘स्टेट्स’मध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती देखील या स्टेटसमध्ये केलेली आहे. पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा या स्टेटसमध्ये आरोप करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहीत संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केलीय.
‘व्हॉट्सअप’वर स्टेटस काय?
मी श्री. शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) मी दिनांक ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते, आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं PM होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल… कारण माझी पत्नी…
Discussion about this post