जळगाव । रावेर येथून भाजपच्या रक्षा खडसे यांनी उमेदवारी दिलेली असली तरी जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद सुरु झाले आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे यांचे तिकीट ऐनवेळी बदलले जाणार असल्याचे संकेत संजय पवार यांनी केलं आहे.
रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांचं तिकीट ऐनवेळी रद्द होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सूचक संकेत दिले आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीमुळे रावेर मतदार संघात बरीचशी कुजबूज चालू आहे. बऱ्याच हालचाली सुरू आहे. गेल्या वेळेस प्रचार सुरू असताना स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द करण्यात आलं होते. यावेळी मात्र स्मिता वाघ यांना वगळण्यात येणार नाही. मात्र रावेर मतदार संघात काहीही होऊ शकते. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी म्हटले आहे.
काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, हे सांगता येणार नाही, असं म्हणत संजय पवार यांनी रावेरच्या जागेबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. भाजप पदाधिकारी रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराजी आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतभेद उघड झाले होते. भाजपच्या गाडीत तुतारीचे कार्यकर्ते फिरत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले होते.















Discussion about this post