मुंबई । अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष हा आमच्या सोबतच आहे’, असं म्हणाले आहे.
तसेच आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भाजपसोबतही जाऊ शकतो, असंही ते म्हणाले आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही माझ्याकडे आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.
आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये जायचा निर्णय घेतला. त्या प्रकारे मी आणि सहकाऱ्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे. इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न राहील. राज्यमंत्रीपद, मंत्रिपदे दिली जातील.”
ते म्हणाले, ”या संदर्भात अनेक दिवस चर्चा चालसू होती. राजकीय परिस्थिती आहे. राज्याची परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार करता विकासाला महत्व दिलं पाहिजे, असं सर्व सहकाऱ्यांचं मत झालं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गेली ९ वर्षे जो कारभार सुरू आहे. ते देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. असं प्रयत्न सुरू असताना त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं मत झालं.”
Discussion about this post