बारामती । देशभरात निवडणुकीचं वारं वाहू लागले असून त्यामुळे देशातील निवडणुकीचं रणही चांगलंच तापलं आहे. मात्र अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती लोकसभेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी महायुतीकडून लोकसभेचा डमी अर्ज भरला होता.
बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. एकाच कुटुंबात लढत होणार असल्याने याकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे.
अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज भरला होता. अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवार असावा म्हणून डमी अर्ज भरण्याची परंपरा आहे. त्यानुसार अजितदादांनीही डमी अर्ज भरला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.















Discussion about this post