जळगाव । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जळगाव दौऱ्यावर आले असून आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शरद पवार यांनी समाचार घेतला.
जालन्यात मराठा मोर्चावर लाठीमार करण्याचे आदेश आमच्याकडून देण्यात आल्याचे सिद्ध झाले तर आम्ही तिघेही राजकारणातून संन्यास घेऊ. मात्र, हे आरोप सिद्ध करता आले नाहीत तर विरोधकांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असं अजित पवार म्हणाले होते. आता यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्हाला एवढं माहिती आहे की, तिथे लाठीहल्ला झाला. या घटनेचे जे काही व्हिडिओ दाखवले जात आहेत, त्यामध्ये पोलीस दलाचे लोक लाठीहल्ला करताना दिसत आहेत. त्याच्या खोलात जाणं सरकारचे काम आहे. आता तो लाठीहल्ला करण्याच्या सूचना कोणी दिल्या, का दिल्या, त्याची गरज होती का, या सगळ्याचे स्पष्टीकरण सरकारनेच द्यावे. कारण यंत्रणा तुमच्या हातात आहेत, आमच्या हातात नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले.
यावेळी शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासंदर्भात होणाऱ्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. मराठा मोर्चावरील लाठीमाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा आंदोलक करत आहेत. याविषयी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ठीक आहे. त्यांनी माफी मागितली ना. म्हणजे लाठीहल्ला कोणी केला, काय केलं, याबाबत थोडीतरी स्पष्टता आली आहे. बाकी फडणवीसांनी राजीनामा द्यावा की नाही, याचं उत्तर सरकारने द्यावे. असंही शरद पवार म्हणाले
Discussion about this post