मुंबई । सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून उमेदवारांच्या प्रचार सभा जोऱ्याने घेतल्या जात आहे. याच दरम्यान, धाराशिवाय येथे प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी यांचं तिसऱ्यांदा सरकार आलं, तर मोफत 300 युनिट वीज मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
अजित पवार म्हणाले, ”राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही चर्चा करतो. आता 300 युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे मोदींच तिसऱ्यांदा सरकार आल्यावर 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.”
ते म्हणाले आहेत की, गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा शेतकऱ्यांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकली आणि पाहिलं बिल दिलं शून्याचे. मात्र नंतर पुन्हा आधी सारखे बिल देण्यास सुरुवात झाली. म्हणाले परवडत नाही. मात्र मोदी हे कुठलंही काम करतात, ते मागील पुढील विचार करून करतात.गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींनी या देशाच नेतृत्व केलं.
3 कोटी घर देण्याचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हे सरकार तुमच आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुख माहीती आहे. 1 रुपयात पिकविम्याचा निर्णय घेतला. ”