नागपूर : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज गोपीनाथ गडावर दाखल झाले होते. तिथं पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यात तब्बल अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यावर बोलनं योग्य होणार नाही. मुंडे आणि खडसे यांनी अनेक वर्ष एकाच पक्षात काम केलं आहे. खडसे मुंडेसाहेबांना मानतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या भेटीवर पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे साहेबांचं जीवन वादळी होतं आणि मी वादळाची लेक आहे. आता इथे वादळ येणार होतं त्याचं डायरेक्शन बदललं आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे नेमकी वादळाची दिशा कोणी बदलली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या चर्चेनंतर वादळाची दिशा बदलली का? असा देखील सूर राजकीय वर्तुळातून काढला जात आहे