मुंबई । राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय महायुतीनं घेतला आहे. या निर्णयाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला असून, मराठीचा बळी देऊन हिंदीचं सक्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली ही मातृभाषा आहे. तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत.’ अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
अजित पवार यांनी हिंदी भाषेवरून राज ठाकरेंचे नाव न घेता थेट मनसेवर (MNS) निशाणा साधल्याने त्याची रिअॅक्शन काय येते, याकडे आता लक्ष असणार आहे.















Discussion about this post