महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झालाअसून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या अपघातावर शंका व्यक्त केली आहे.
हा केवळ अपघात आहे की यामागे काही घातपात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता या दुर्घटनेच्या तपासात एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
आज संध्याकाळी येणार DGCAचा प्राथमिक अहवाल
आज, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी DGCAचा प्राथमिक अहवाल जाहीर होणार आहे. हा अहवाल DGCAच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल. या अहवालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत, कारण यात अपघाताच्या कारणांबाबत महत्त्वपूर्ण माहिती असण्याची शक्यता आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने गेल्या एका महिन्यात या दुर्घटनेचा सखोल तपास केला आहे.
हा प्राथमिक अहवाल त्या तपासाच्या आधारावर तयार करण्यात आला असून, यातील मुद्द्यांवर आधारित अंतिम अहवाल नंतर प्रकाशित होईल. आज संध्याकाळी हा संपूर्ण अहवाल उपलब्ध होईल, ज्यात तपासाच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली जाईल. यामुळे अपघाताच्या रहस्यावर प्रकाश पडण्याची अपेक्षा आहे.
आजच्या अहवालात कोणती माहिती अपेक्षित?
AAIB ही DGCAची एक स्वतंत्र एजन्सी आहे, जी गेल्या एका महिन्यापासून अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास करत आहे. या तपासाच्या आधारे तयार झालेला प्राथमिक अहवाल आज संध्याकाळपर्यंत सादर होईल. या अहवालात महिनाभराच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष आणि मुद्दे समाविष्ट असतील. विशेषतः, अपघात नेमका कसा घडला? यामागे कोणत्या तांत्रिक किंवा मानवी चुका होत्या? आणि यात दोषी कोण असू शकतो? याबाबतची प्राथमिक माहिती मिळेल.















Discussion about this post