मुंबई । अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली असून या अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली आहे. आता त्यामध्येच आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले.
विमानाची किंमत १०-१५ कोटी रूपयांची होती तर २१० कोटी रुपयांचा ‘लायबिलिटी इन्शुरन्स’ कोणासाठी होता? असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय. विमानातील अतिरिक्त इंधन टाक्यांमुळेच ब्लॅक बॉक्स जळल्याचा आरोप करत, त्यांनी यामागे पायलटचा वापर करून रचलेला ‘घातपात’ असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले ?
९० कोटी रुपये खर्च करून युनियन मिनिस्टर राममोहन नायडू साहेबांनी काही महिन्यांपूर्वी एक लॅब इनगरेट (उद्घाटन) केली. आता एवढी हाय- लॅब तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला बाहेर पाठवण्याचं काय कारण? बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर पाठवत नाही, तर ते या लॅबमध्ये इथेच भारतामध्ये बसून तुम्हाला माहिती काढता येत नाही का? टेक्निकल एजन्सीची मदत घ्या असं आम्ही सांगितलं होतं. तुम्ही सुद्धा आता म्हणताय की नाही आता आम्ही टेक्निकल एजन्सी फक्त टेक्निकल गोष्टीसाठी बाहेरच्या एजन्सीची मदत घेऊ, ते सुद्धा कॅनडाचं..
याच्यामध्ये अजून एक इन्शुरन्सबाबत महत्त्वाची माहिती आहे. या विमानाची किंमत किती? आज ते विमान जे होतं, जे आज असतं तर त्याची ॲक्चुअल किंमत ३५ कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचे त्याचे इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले, ते आज १० ते १५ कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. ज्या लोकांनी आधी विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाहीत, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की १० कोटी दिलं कोणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता १०-१५ कोटीच्या किमतीचं जे विमान होतं, त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती? तर ५५ कोटी रुपये होती. लायबिलिटी इन्शुरन्स किती होता? २१० कोटी. म्हणजे आत बसणारी लोकं, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर २१० कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता याच्यामध्ये पायलट सुद्धा आले. याच्यामध्ये पाचहीच्या पाचही जण आली. मग या २१० कोटींपैकी मेन पायलटला किती रुपये मिळणार होते? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का? खरंच इन्शुरन्स मिळणार होता का? याबाबतीत स्पष्टीकरण होणं महत्त्वाचं आहे.














Discussion about this post