आत्ताच्या घडीची एक ब्रेकींग न्यूज समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाचा भीषण अपघात झाला आहे.
या विमान अपघाताचे फोटो समोर अंगावर काटा आणणारी आहेत. भीषण अपघातात विमान जळून खाक झाले आहे. या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे.
या घटनेची माहिती मिळाताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाले आहेत.















Discussion about this post