पुणे । येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार असून याच पार्श्वभूमीवर सध्या विविध राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. याच दरम्यान, अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे देखील आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवडमधून अनेक जण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गव्हाणे उद्या शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच पिंपरी चिंचवडमधील अनेक मुख्य पदाधिकारी देखील आज पक्षप्रवेश करणार आहेत.
Discussion about this post