मुंबई : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. गाफील राहू नका. कुणी काही वक्तव्यं करतं तसं करू नका. जर असं कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद देवेंद्र फडणवीस , रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे घेतात. आमची यावर व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दुखवून घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले.
आगामी निवडणुकीत ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आपलं स्लोगन आहे. निवडणूक 48 जागा मध्ये तिन्ही पक्षात त्यान्हा जागा मिळेल त्यान्हा मनापासून काम मारून त्यान्हा निवडून द्या. नरेंद्र मोदी यान्हा पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहेत. लवकरच नमो मेळावे आपण घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.
गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी इथे आपली सीट आणायची आहे.आपण सर्व उमेदवार आहात, असा विचार करून काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.तुम्ही होम ग्राउंग सांभाळा… आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करा. कुठे दगडफेक केली, कुठे शिवीगाळ केली अस आपण करू नका.
Discussion about this post