जळगाव । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर दिनांक २ फेब्रुवारी रोजी येतं असून अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान चोपडा येथे घन:श्याम अग्रवाल यांनी शंभर कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.यामुळे परिसरातील चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
तसेच यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा मेळावाही होणार असल्याने तेथे ते उपस्थित राहणार आहे.
Discussion about this post