नाशिक । राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आली असून मात्र दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत अनेक नेत्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. नाराज नेत्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार गटाच्या समीर भुजबळ यांनी पक्षाची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
समीर भुजबळ यांच्या घोषणेने सुहास कांदे यांचं टेन्शन वाढलं आहे. त्यानंतर सुहास कांदे यांनी येवल्यात छगन भुजभळ यांच्या विरोधात अपक्ष अर्ज घेतला आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळ विरुद्ध कांदे लढत पाहायला मिळणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.