मावळ : आगामी निवडणूक तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळ तालुक्यात अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे १२५ कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आगामी निवडणूक तोंडावर कारकर्त्यांना कामे नेमून देत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतले जात नसल्याचे कारण सांगत सामूहिक राजीनामा दिला आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का समजला जात आहे.
दरम्यान आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम करतो. परंतु बदलत्या परिस्थितीत आपणाकडून व आपल्या शिस्तप्रिय नेतृत्वाकडून योग्य ती दखल न घेतल्याने लोणावळ्यातील कार्यकर्त्यावर अन्याय घेतली जात नाही. त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही. आपणासही वारंवार कळविले आहे. मात्र आपणाकडून त्याची दखल घेतल्या जात नाही. त्याच्यामुळे आम्ही सामूहिरित्या राजीनामा देत आहे. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याने नाराजीतून राजीनामा देण्यात आला असल्याची सध्या मावळत सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Discussion about this post