जळगाव । निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाला असून याचा राज्यातील विविध ठिकाणी अजित पवार गटाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर अजित पवार गटाकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
मात्र त्याच ठिकाणी दुसरीकडे शरद पवार गटाच्या वतीने काळा फित लाऊन निदर्शने करण्यात आली आहे. यामुळे अजित पवार आणि शरद पवार गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी आमने सामने येत राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर एकाच वेळी जल्लोष आणि निदर्शने करण्यात आल्याने वातावरण चांगलच तापले होते.
शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार आणि त्यांच्या गटाला गद्दार संबोधित करत अर्वच्या भाषेत घोषणा बाजी केली,आणि या विषयात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरी कडे अजित दादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा सत्याचा आणि संख्या बळाचा विजय असून संविधान नुसार दिलेला निर्णय असल्याचं म्हटल आहे.
Discussion about this post