राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
अजित पवार यांचे फेसबुक पेज हॅक झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. अजित पवारांच्या फेसबुकवरुन अडल्ट कंटेंट असलेल्या पगलेट क्वीन नावाच्या फेसबुक पेजला काल रात्री फॉलो करण्यात आले. यापूर्वी अजित पवारांच्या फेसबुक पेजवरुन 4 जणांना फॉलो केले जात होते. यात पार्थ अजित पवार, एनसी स्पीक्स, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या चार नावांचा समावेश होता. त्यानंतर अचानक रात्री या पगलेट क्वीनला फॉलो करण्यात आले.
अजित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन एक आक्षेपार्ह मजकूर असलेले एक फेसबुक पेज फॉलो करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट काढून जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवली जात आहे. या फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे.















Discussion about this post