राज्याच्या राजकारणातील एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळवा होणार आहे. याच मेळाव्यात अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका पुतण्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान अजित पवार विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली आणि सत्तेत सामील झाले. महायुतीत समावेश झाल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीत उतरले. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार अशी काका-पुतण्याची वर्चस्व वादाची लढाई पाहायला मिळाली होती. आता विधानसभेतही काका-पुतण्याची लढाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय झालेत. शरद पवार यांच्या अनेक कार्यक्रमात युगेंद्र पवार दिसले होते. लोकसभा निवडणुकीच्या त्यामुळे बारामती पुन्हा युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात सामना रंगणार, असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी अजित पवार बारामती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत अशी चर्चा अजित पवार यांच्या गटात होती.
Discussion about this post