बारामती । राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांचा गट आणि अजित पवार यांचा गट असे दोन गट तयार झाले. यानंतर इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगल्याचा पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघात सुरूवातीचे कल समोर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या कलामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत मोठी आघाडी घेतली आहे.
निकालामध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे समजताच बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, सुप्रिया सुळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या. बारामतीप्रमाणे साताऱ्यातही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला असून शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी पाचव्या फेरी अखेर २१ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.















Discussion about this post