नाशिक । आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे. आज नाशिकमध्ये ही यात्रा होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना त्यांनी चक्क जनतेची माफी मागितली.
सरकार चालवताना काही चुका झाल्या. त्यामुळे लोकसभेत पराभव झाल्याने अजितदादा यांनी जनतेची माफी मागितली आहे. लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागला आहे, कंबर मोडायची वेळ आहे चूक झाली माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अब की बार ४०० पार मुळे देखील झटका लागला कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी करायची नाही,” असे म्हणत अजित पवार यांनी लोकसभेला कांदा निर्यातबंधीच्या निर्णयाचा फटका बसल्याची कबुली दिली.
मी सरकारमध्ये नसतो तर चांगल्या योजना देता आल्या असत्या का? मी जे काही केलं ते महाराष्ट्राच्या आणि राज्यातील जनतेच्या विकासासाठी केलं आहे. भावनिक होवू नका, आपल्याला राज्य कारभार चांगला करायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.















Discussion about this post