मुंबई । लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला असून राज्यात महाविकास आघाडीने सगळ्यात जास्त जागा जिंकल्या आहे. यांनतर आता बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाच्या आमदारांकडून सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. बारामतीमध्ये चुरशीची लढत झाली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यामुळे अजित पवार गटाचे १० आमदार घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या गोटात जोरदार खलबतं सुरु आहेत. इंडिया आघाडीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीत ही बैठक पार पडत आहे. या बैठकीचं उद्धव ठाकरे यांनासुद्धा निमंत्रण आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत हे दिल्लीला बैठकीला गेले आहेत. या बैठकीत नेमके काय खल होतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.















Discussion about this post