एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये आयटीआय अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला NATS पोर्टल nats.education.gov.in या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
एएआयच्या च्या भरती मोहिमेद्वारे १३५ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यातील ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ४५ पदे रिक्त आहेत. तर डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ५० जागा रिक्त आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ४० जागा रिक्त आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात ४ किंवा तीन वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत आयटीआय अप्रेंटिस पदासाठी आयटीआय/NCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वयोगट २६ वर्ष असावा. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. कागदपत्रे पडताळणीनंतर तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीच्या मुलाखतीबाबत आणि कागदपत्रे पडताळणीसाठी ई मेलवर माहिती देण्यात येणार आहे. (Airport Jobs)
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तर आयटीआय अप्रेंटिस पदासाठी ९००० रुपये वेतन दिले जाणार आहे.