अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ बुधवारी भयंकर अपघात घडला आहे. ज्यामध्ये लँडिंग करताना प्रवाशांनी भरलेले विमान आणि हेलिकॉप्टरची धडक झाली. अपघातानंतर विमान नदीमध्ये पडले. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या विमानातून ६० प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊसच्या जवळ विमानाला अपघात झाला. रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमानाने हेलिकॉप्टरला धडक दिली. अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीमध्ये पडले. हा अपघात हेलिकॉप्टरला धडक दिल्यामुळे झाला. हे विमान अमेरिकेतील कंसास सिटीवरून वॉशिंगटनला येत होते. कॅनडा एअरचे हे विमान होते.
Something is SERIOUSLY F-ed up here.
Who was on the Blackhawk… and who was on the American Airlines flight.
pic.twitter.com/V1Ri1QKTFe— NOTDaleJR88 (@NOTDaleJR88) January 30, 2025
अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीमध्ये पडले. विमानामध्ये ६० प्रवासी होते. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. ज्या हेलिकॉप्टरला विमानाने धडक दिली ते हेलिकॉप्टर अमेरिका लष्कराचे होते. या अपघातानंतर रील नॅशल एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. ही घटना घडली त्या एअरपोर्ट आणि व्हाइट हाऊसमध्ये फक्त ३ किलोमीटरचे अंतर आहे.
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्येच उपस्थित होते. हा अपघात आहे की घातपात याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोटोमॅक नदीमध्ये बर्फ तयार झाला आहे त्यामुळे प्रवाशांची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.















Discussion about this post