मुंबई | कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसललं. वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात होण्यापासून वाचला. या प्रकारामुळे काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना विमानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सोमवारी सकाळी एअर इंडियाचे कोचीहून मुंबईला येणारे विमान धावपट्टीवरून घसरलं. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, सर्व प्रवासी व चालक दल सुरक्षित आहेत.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. 21 जुलै 2025 रोजी कोचीहून मुंबईला येणारे विमान क्रमांक AI-2744, लँडिंगदरम्यान मुसळधार पावसात सापडले. त्यामुळे लँडिंगनंतर ते धावपट्टीवरून घसरले. विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचले आणि सर्व प्रवासी व चालक दलाचे सदस्य खाली उतरले. विमानाची तपासणी करण्यासाठी ते थांबवण्यात आले आहे. प्रवाशांची आणि चालक दलाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियानं म्हटलं आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने या घटनेला तात्काळ प्रतिसाद देत सुरक्षा प्रक्रियेनुसार आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केले. सीएसएमआयएच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना (Emergency Reaction Teams) घटनेला सामोरे जाण्यासाठी तात्काळ सक्रिय करण्यात आले.
Discussion about this post